S M L

पुण्यात आघाडीचा पोपट पुन्हा जिवंत !

Sachin Salve | Updated On: Feb 2, 2017 09:41 PM IST

ncp_congressअद्धैत मेहता, पुणे

02 फेब्रुवारी : काँग्रेस राष्ट्रवादीचा आघाडीचा मेलेला पोपट पुन्हा जिवंत करण्यात आलाय. या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्याना आघाडी नको असताना नेत्यांनी मात्र आघाडीचा चंग बांधला याचं कारण म्हणजे यंदा काही खरं नाही. एकत्र लढलो तर थोडीफार आशा हा झालेला साक्षात्कार...

पृथ्वीराज चव्हाण यांना पुण्यात राष्ट्रवादीसोबत आघाडी नको यावर ठाम होते. पण अजित पवार आग्रही असल्याने त्यांनी अशोक चव्हाण यांच्याशी संधान साधलं. अशोकराव आणि अजितदादा यांच्यात बैठका झाल्या. प्रदीर्घ चर्चा झाली आणि एकेक वॉर्ड घेऊन आढावा घेण्यात आला. काँग्रेसचे शहर अध्यक्ष रमेश बागवे आणि राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्ष वंदना चव्हाण यांनी जागा वाटपाचे अनेक फॉर्म्युले वर्कआऊट केले पण एकमत होईना. शेवटी विश्वजित कदम ही आले आणि मग जिथं एकमत तिथं आघाडी आणि जिथं मतभेद तिथं मैत्रीपूर्ण लढत असा सुवर्ण मध्य काढण्यात आला.

आत्तापर्यंत पुण्यात काँग्रेस राष्ट्रवादीची पालिका निवडणुकीला कधीच आघाडी झाली नाही आणि सेना भाजप मात्र गेल्यावेळी एकत्र लढले होते. आता यंदा अगदी उलट झालंय, म्हणजे सेना भाजप वेगळे लढत आहेत आणि काँग्रेस राष्ट्रवादी  100 ठिकाणी एकत्रमात्र 162 पैकी 62 जागी मैत्रीपूर्णलढती रंगणार आहेत.

म्हणजे कुठं गळ्यात गळे तर कुठं पायात पाय त्यामुळे कार्यकर्ते हैराण आहेत. राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता आहे तर काँग्रेसमध्ये उघड नाराजी आहे. राष्ट्रवादी बेभरवासा आहे,स्वार्थी आहे. काँग्रेस बॅकफूटवर गेली. स्वबळावर सत्ता आली असती अशा शब्दात कार्यकर्त्यांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.

Loading...

त्यामुळे आता पुण्याचा कारभारी कोण?, आधी सुरेश कलमाडी आणि नंतर अजित पवार यांचं वर्चस्व राहिलेली. पुणे पालिका खेचून घेण्यास भाजप उत्सुक आहे. शिवसेनेनं कंबर कसलीय,मनसे ही आस लावून आहे.  23 फेब्रुवारीला याचं उत्तर मिळणार असली तरी आता युती,आघाडी च्या चर्चा थांबून प्रत्यक्ष लढाई ला सुरुवात होतेय.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीपैकी आघाडी कम मैत्री पूर्ण लढतीचा कुणाला फायदा होतो कुणाला फटका बसतो याची उत्सुकता मात्र आता शिगेला पोचलीय. आघाडीचा मेलेला पोपट जिवंत करण्यात आल्यामुळे दोन्ही पक्षांची प्रतिष्ठापणाला लागलीय हे मात्र नक्की.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 2, 2017 09:41 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close