S M L

फुले पगडी देऊन ओवेसींचा सत्कार

Sachin Salve | Updated On: Feb 2, 2017 08:29 PM IST

फुले पगडी देऊन ओवेसींचा सत्कार

02 फेब्रुवारी : महापालिकांची रणधुमाळी आता रंगात आलीय. काल पुण्यात एमआयएमचे नेते अकबरूद्दीन ओवेसींची सभा पार पडली आणि यात ओवेसींनी मोदींसह ठाकरेंवरही सडकून टीका केली. हा देश जेवढा नरेंद्र मोदींचा आहे तेवढाच तो मुसलमानांचाही आहे असं वक्तव्य ओवेसींनी केलंय.

कुठल्याही ठाकरे-पवारांना घाबरण्याचं कारण नाही, त्यामुळे एमआयएमला मतदान करा असं आवाहनही अकबरूद्दीन ओवेसींनी केलं. विशेष म्हणजे पुण्यात आलेल्या पाहुण्यांचा सत्कार पुणेरी पगडीनं केला जातो. अकबरूद्दीन ओवेसींचाही सत्कार पगडीनं केला गेला पण ही पगडी महात्मा फुलेंची पगडी होती. फुलेंचा रूमालही ओवेसींना दिला गेला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 2, 2017 08:29 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close