S M L

पुण्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचं जमलं, 100 जागांवर आघाडी

Sachin Salve | Updated On: Feb 2, 2017 06:56 PM IST

पुण्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचं जमलं, 100 जागांवर आघाडी

02 फेब्रुवारी : पुण्यात तुटलेली आघाडी पुन्हा एकदा ट्रॅकवर आली असून 100 जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी जमलीये.  उर्वरीत 62 जागांवर आघाडीची मैत्रिपूर्ण लढतीवर तोडगा काढण्यात आलाय. तर राष्ट्रवादीची यादी उद्या जाहीर होईल असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण आणि अजित पवार यांच्यात काल रात्री उशिरा झालेल्या चर्चेनंतर पुण्यात आघाडी स्थापन करण्याच्या घडामोडींना वेग आलाय. या संदर्भात दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली. यामध्ये ज्या ठिकाणी शक्य आहे तिथ आघाडीने लढावं, तर मतभेद असलेल्या वार्डात दोन्ही पक्षामध्ये मैत्रीपूर्ण लढत व्हावी असं या बैठकीत ठरलंय. त्यानुसार 100 जागांच्या आघाडीवर शिक्कामोर्तब करण्यात आलंय.  या बैठकीला राष्ट्रवादीकडून अजित पवार, शहराध्यक्ष वंदना चव्हाण, तर काँग्रेसकडून विश्वजित कदम आणि शहराध्यक्ष रमेश बागवे उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 2, 2017 06:56 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close