S M L

पुण्यात आघाडीसाठी पुन्हा चर्चा सुरू

Samruddha Bhambure | Updated On: Feb 2, 2017 04:30 PM IST

पुण्यात आघाडीसाठी पुन्हा चर्चा सुरू

02 फेब्रुवारी :  पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आघाडीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. आघाडी करण्यासंदर्भात काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी काल रात्री उशीरा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याशी चर्चा केली आहे.

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 3 फेब्रुवारीपर्यंत आहे. पण पुण्यात आघाडीत जागावाटपाचा तिढा कायम होता. मात्र, आता आज आघाडीसंदर्भात दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

दोन्ही पक्षांनी आघाडीची चर्चा पूर्ण थांबवून सर्व लक्ष आपापल्या पक्षांच्या उमेदवारांच्या याद्या निश्‍चित करून त्या जाहीर करण्याकडे दिलं. त्यामुळे आघाडीची शक्‍यता मावळल्याचं चित्रं होतं. मात्र, पुण्यात आघाडी व्हावी यासाठी स्वत: अजित पवार आणि अशोक चव्हाण आग्रही आहेत.

त्यामुळे यावर समाधानकारक तोडगा काढण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षाचे नेते करत आहेत. त्यामुळे पुण्यात काँग्रेस आघाडीची शक्यता पुन्हा बळावलीय.

Loading...
Loading...
Loading...
Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 2, 2017 04:29 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close