S M L

कल्पना चावलाच्या स्मृतिदिनानिमित्त तिला सलाम

Sonali Deshpande | Updated On: Feb 1, 2017 01:49 PM IST

कल्पना चावलाच्या स्मृतिदिनानिमित्त तिला सलाम

हलिमा कुरेशी,01 फेब्रुवारी : भारतीय वंशाची  अंतराळवीर कल्पना चावलाचा  कोलंबिया यानाच्या दुर्घटनेत १ फेब्रुवारी  २००३ साली मृत्यू झाला.  या दुर्घटनेला आज १४ वर्ष पूर्ण होत आहेत. पुण्यात तिला आदरांजली वाहण्यात आली. तिच्या आठवणी जागवल्या.

केनेडी स्पेस सेंटरवर कोलंबिया (एस टीएस १०७) यान  उतरण्यास अवघे १६ मिनिटं बाकी असतानाच कोलोम्बियाचा टेक्ससच्या आकाशात  स्फोट झाला. डाव्या पंखाच्या वरील सुरक्षा आवरणाचा तुकडा पडल्याने अतिउष्णता तयार होऊन ही दुर्घटना घडली. सर्वजण आकाशात पाहत असतानाच तुकडे तुकडे होऊन कोलोम्बिया कोसळलं.

कोलंम्बिया यानाचं हे २८वं उड्डाण होतं. १६ दिवस अंतराळात ८० प्रयोग करून यान पृथ्वीवर परतताना टेक्सासच्या वातावरणात स्फोट होऊन सातही  अंतराळवीर मृत्युमुखी पडले होते. अंतराळात खाणं,पिणं,काम करणं खूप अवघड असतं. गुरुत्वाकर्षण नसल्याने तरंगतच प्रयोग आणि इतरही काम करणं खूपच जिकीरीचं असतं. मात्र कल्पना चावला आणि सहकारी अंतराळवीरांनी अतिशय जिद्दीने सगळं पार पाडलं होत.  १९८६ साली चॅलेंजर हे यान  प्रक्षेपणानंतरच दुर्घटनाग्रस्त होऊन अंतराळवीर मृत्युमुखी पडले होते,  त्यानंतर १७ वर्षांनंतर कोलंबिया यान दुर्घटना घडली.

१९९४मध्ये कल्पना चावलाची नासामध्ये  अंतराळवीर म्हणून निवड झाली होती. कर्नाल हरियाणा येथून ती नासापर्यंत पोहोचली होती. पहिली भारतीय महिला अंतराळवीर कल्पना चावला  अतिशय धाडसी,हुशार आणि सर्वांची आवडती होती. १९८२मध्ये पंजाब इंजीनियरिंग कॉलेजमधून कल्पना चावला पहिली महिला एअरोनॉटिकल इंजीनियरिंग बनून बाहेर पडली.अतिशय संकुचित असं वातावरण  असताना देखील कल्पना चावला यांचे वडील बनारसीलाल चावला यांनी मुलीला नेहमी प्रोत्साहन दिलं.

पुण्यातील लीना बोकील या विज्ञान प्रसारक म्हणून काम करतात. कल्पना चावला याच्या कुटुंबियांशी त्या जवळ आहेत. कल्पना चावलाच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्या अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत.  यामुळे करिश्मा इनामदार आणि हेमिल मोदी हे विद्यार्थी नासापर्यंत पोहोचलेत. लीना बोकील स्वतः चार वेळा नासात प्रशिक्षणासाठी जाऊन आल्या आहेत.

कल्पनांच्या स्मृतीप्रित्यर्थ हवामानाची माहिती देणारं 'कल्पना सॅटेलाईट' भारताने अवकाशात सोडलाय.इस्रोच्या अहमदाबाद सेंटरचे माजी संचालक प्रमोद काळे कल्पनाबद्दल भरभरून बोलत होते.

'कल्पना चावला ही भारतीयांसाठीच नाही तर जगासाठी प्रेरणा बनलीय.कल्पनानंतर सुनीता विलियम्स हे भारतीयांसाठी जवळचं नाव.अमेरिकी नागरिक असलेल्या सुनीता विलियम्सनं अंतराळात जास्त स्पेस वाॅक करणारी महिला अंतराळवीर म्हणून विक्रम केलाय. कल्पना सर्वांना कळावी यासाठी कराडमध्ये संजय पुजारींनी कल्पना चावला सायन्स सेंटर दहा वर्षांपूर्वी सुरू केलंय.

लहानपणापासूनच कल्पनाला अवकाश आणि तारे आवडायचे आणि तिचा शेवट अवकाशातच झाला. कल्पनांच्या धैर्याला कर्तृत्वाला सलाम.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 1, 2017 09:00 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close