S M L

पुण्यात आघाडीचा पोपट मेला !

Sachin Salve | Updated On: Jan 31, 2017 10:08 PM IST

पुण्यात आघाडीचा पोपट मेला !

वैभव सोनवणे,पुणे

31 जानेवारी : राज्यात युतीचा ब्रेकअप झाल्यानंतर आघाडीचं काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र आता पुणे महापालिकेत तरी आघाडी होणार नाही हे स्पष्ट झालंय. राष्ट्रवादीसोबत न जाण्याचा निर्णय काँग्रेसच्या संसदीय मंडळाने घेतलाय

युती तुटल्यानंतर राजकारणात बेरकी समजले जाणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे आघाडी करतील आणि भाजप समोरची आव्हान आणखी वाढवतील असा कयास होता. त्यात भरीस भर म्हणून शरद पवार यांनी स्वतः समविचारी पक्षांनी एकत्र येऊन भाजपला सत्तेपासून दूर ठेवा असा सल्ला ही दिला होता मात्र काय धरावं आणि काय सोडावं अशा विवंचनेत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला शेवटपर्यंत आकड्यांचा खेळ मांडताच आला नाही.

त्यात काँग्रेस च्या कार्यकर्त्यांच्या मनात राष्ट्रवादीबद्दल सुप्त आकस आहे आधी आघाडी करूननंतर राष्ट्रवादी काँग्रेस कडून फसवणूक होते असा त्यांचा अनुभव आहे. त्यामुळे दोन नगरसेवक कमी निवडून आले तरी चालतील मात्र या राष्ट्रवादीच्या आडकाठ्या नको अशी भूमिका त्यांनी घेतली होती आणि हीच भूमिका नेत्यांनी संसदीय बोर्डाच्या बैठकीत मांडल्या त्यामुळे आधी आघाडीला अनुकूल असलेले प्रांताध्यक्ष अशोक चव्हाण ही बॅकफूटवर गेले. अखेर राष्ट्रवादीसोबत आघाडी करायची असा निर्णय रात्रीच या बैठकीत घेण्यात आला.

राष्ट्रवादीच्या गोटात मात्र शरद पवार आणि अजित पवार यांनी पुढाकार घेतल्यामुळे फारसं कुणी आघाडीविरोधात बोललं नाही त्यात चर्चेचे अधिकार चर्चा भरकटू नये म्हणून फक्त शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांनाच देण्यात आले. काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्यासोबत चर्चा करताना उच्च्शिक्षित वंदना चव्हाण या सरस ठरत होत्या. सुरुवातीला होईल होईल असा वाटणारी आघाडी काँग्रेसच्या बाकीच्या नेत्यांनी बागवेना राष्ट्रवादी गुंडाळत असल्याची भूमिका उठवून आणखी अडचणीत आणली.

Loading...

अनेक फॉर्मुल्यांवर चर्चा झाली मात्र जिथे एकाच प्रभागात दोन्ही पक्षाचे नगरसेवक विद्यमान आहेत. ते प्रभाग सोडायला कुणीच तयार होत नव्हतं. बैठकांवर बैठकांचा सत्र सुरू राहील मात्र निर्णय होऊ शकला नाही. अखेर काँग्रेसनेच आघाडीच्या पोपटाचा गळा संसदीय बोर्डाच्या बैठकीत घोटला पण जाहीर काही केलंच नाही.

बागवे यांनी आघाडी करणार नसल्याची माहिती फोन करून वंदना चव्हाण यांना दिली खरी मात्र आपण याबाबतची घोषणा करणार नाही अशी भूमिका वंदना चव्हाण यांनी घेतली. आता हेही कमी की काय म्हणून दोन्ही पक्षांची पहिली यादी उद्याच जाहीर करणार आहेत.आता निवडणुकीसाठी या दोन्ही पक्षांना शुभेच्छा. कारण सगळ्यांना माहितीये पोपट केव्हाच मेलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 31, 2017 10:08 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close