गडकरींचा पुतळा बसवाच, नाट्यक्षेत्रातले कलाकार एकवटले

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jan 31, 2017 03:57 PM IST

गडकरींचा पुतळा बसवाच, नाट्यक्षेत्रातले कलाकार एकवटले

artist gadkari31 जानेवारी : राम गणेश गडकरी यांचा पुतळा पुन्हा संभाजी उद्यानात बसवावा या मागणी करता पुण्यात नाट्यक्षेत्रातील कलाकार एकत्र आले.यावेळी पुतळा पुन्हा बसवण्याचा निर्धार करण्यात आलाय पण त्याचसोबत कलेच्या क्षेत्रात होत असलेली गळचेपी,वाढती असहिष्णुता याचा एकत्रित मुकाबला करण्याचा निश्चयही करण्यात आला.

यावेळी बोलताना अमोल पालेकर,सतीश आळेकर मोहन आगाशे या ज्येष्ठ कलाकारांनी नाट्यकलावंतासोबत प्रेक्षकांना सहभागी होण्याचं आवाहन केलं.शांतता,सनदशीर ,कायदेशीर मार्गाने पुतळा बसवण्याचा पाठपुरावा करायचा तसंच या निमित्ताने गडकरी यांचं साहित्य लोकांपर्यंत पोचवायचं,त्यांच्याबद्दलचे समज खोडून काढायचे असं ठरवण्यात आलं. त्याकरता त्यांच्या नाटकांचं अभिवाचन, निवडक साहित्यावर आधारित प्रयोग असे कार्यक्रम सादर करायचा निर्णय घेण्यात आला.

gadkari putla

यावेळी दिग्गज आणि नवोदित कलाकार जमले होते.पुणे पालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांची पालिकेत जाऊन कलाकारांच्या शिष्ट मंडळाने गाठही घेतली.संभाजी ब्रिगेडने 3 जानेवारीला गडकरी यांचापुतळा हटवला असून गडकरी यांच्याऐवजी छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसवण्याची मागणी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 31, 2017 03:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...