S M L

राज्यात मालवाहतूकदारांचा कडकडीत संप

Sonali Deshpande | Updated On: Jan 31, 2017 12:33 PM IST

राज्यात मालवाहतूकदारांचा कडकडीत संप

31 जानेवारी : आज राज्यभर रिक्षासह प्रवासी आणि मालवाहतुकदारांचा कडकडीत बंद आयोजित केलाय. या बंदच्या समर्थनार्थ पुण्यात रिक्षा पंचायतीपासून मोर्चा काढला जाणार आहे.

नुकतीच केंद्र सरकारने विविध परिवहन शुल्कामध्ये दुप्पट ते 30 पट अशी प्रचंड वाढ केली.या 'जिझिया'वाढीमुळे वाहन उद्योगाचे कंबरडंच मोडलं आहे. म्हणून ही शुल्कवाढ मागे घ्यावी या मागणीसाठी आज पुण्यासह राज्यात रिक्षा,टॅक्सी,ट्रक,टेम्पो,बस,स्कुल व्हॅन कडकडीत बंद पाळणार आहेत.

सरकारकडे या बाबतचे गाऱ्हाणे मांडण्यासाठी जिल्हाधिकारी कचेरीवर रिक्षा पंचायत कार्यालयापासून मोर्चाही नेण्यात येणार आहे. या संपामुळे पुणेकरांना अडचणींना तोंड द्यावं लागत आहे. या संपात जीवनावश्यक सुविधांना वगळलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 31, 2017 10:00 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close