S M L

पुण्यात सारं कसं शांत शांत...

Sachin Salve | Updated On: Jan 30, 2017 09:51 PM IST

पुण्यात सारं कसं शांत शांत...

अद्वैत मेहता, पुणे

30 जानेवारी : पुण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीचा घोळ आठवडा उलटून गेला तरी संपता संपत नाहीये. युतीचा पोपट मेला,त्याची घोषणा खुद्द उद्धव ठाकरे यांनी केली पण आघाडीच्या पोपटाचं काय? याचा फैसला अजित पवार आणि अशोक चव्हाण घेणार आहेत.

दुसरीकडे पुण्याच्या मनसेची जबाबदारी असलेले बाळा नांदगावकर थेट 'मातोश्री'वर पोहचले आणि पुण्याच्या मनसे कार्यकर्त्यांत अस्वस्थता,उत्सुकता पसरली. राज आणि उद्धव एकत्र आले तर मराठी माणसाचा फायदाच आहे. पण ज्या सेनेला टार्गेट केलं त्यांच्याशी जुळवून घ्यायचं शिवाय पुण्यात मनसेचे 28 नगरसेवक तर सेनेचे 12 मग आम्ही मोठेभौ अशी चर्चा आकडेमोड सुरू झाली.तिकडं सेनाही पहिली यादी जाहीर करणार होती पण मुहूर्त मिळेना.. जो दुसऱ्या पक्षाचा तगडा उमेदवार तो आपला मग गुंड का असेना अशी नीती असलेल्या भाजपमध्ये कुणाला उमेदवारी द्यायची आणि कुणाची कापायची यावरून काथ्याकूट आहे. गिरीश बापट भेटेनासे झालेत आणि काकडे सापडत नाहीत. म्हणून इच्छुक खेटे मारून वैतागलेत त्यात आघाडी होतेय का ?, सेना मनसे एकत्र येत आहेत का यावर आणखी नाराज गळाला लागतील म्हणून भाजपेयी खुश आहेत.

एकूण काय जो तो एकमेकांच्या वासावर आहे म्हणून 27 पासून उमेदवारी अर्ज भरायची मुदत सुरू झाली तरी सर्वच राजकीय पक्षात शांतता आहे,चहल पहल नाही मात्र ही वादळापूर्वीची शांतता असू शकतें हे मात्र नक्की.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 30, 2017 09:51 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close