पुणे स्टेशनवर चेन्नई एक्स्प्रेसमधून तब्बल 2.50 कोटींचे सोन्याचे दागिने जप्त

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 28, 2017 04:20 PM IST

पुणे स्टेशनवर चेन्नई एक्स्प्रेसमधून तब्बल 2.50 कोटींचे सोन्याचे दागिने जप्त

pune_gold28 जानेवारी : पुणे लोहमार्ग पोलिसांनी चेन्नई एक्स्प्रेसमधून 2.50 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. जप्त करण्यात आलेले दागिने साडेआठ किलो वजनाचे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेऊन याबाबतची माहिती प्राप्तीकर विभागालाही कळवली आहे.

गोविंद प्रजापती, विपुल राव आणि प्रतापसिंह राव अशी ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. हे तीन जण प्लाॅस्टिकच्या दोन डब्यांमध्ये दागिने मुंबईतील जव्हेरी बाजारातील एका व्यापा-याकडे घेऊन जात असल्याची माहिती समोर आली आहे.  26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर तपासणी सुरू असताना गोविंद प्रजापती हा संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. त्याला ताब्यात घेतले असता, लपूनछपून सोने नेले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 28, 2017 04:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...