S M L

पिंपरी-चिंचवडमध्ये युती फिस्कटल्यात जमा

Sachin Salve | Updated On: Jan 19, 2017 08:17 PM IST

sena_bjp319 जानेवारी : पिंपरी चिंचवडमध्ये आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकींसाठी,भारतीय जनता पार्टी  आणि शिवसेनेमध्ये युती होण्याच्या सर्व शक्यता आता मावळल्या आहेत. आपण दिलेल्या जागा मिळणार असतील तरच युती करू अशा पद्धतीची टोकाची भूमिका घेत दोन्ही पक्षातील नेत्यांनी एकेमकांना थेट अल्टीमेटम दिला आहे.

भाजप शहराध्यक्ष  लक्ष्मण जगताप आणि शिवसेना शहराध्यक्ष राहुल कलाटे यांनी या बाबत आपल्या भूमिका स्पष्ट केल्या आहेत. पिंपरी महापालिकेतील 128 जागांसाठी या दोन्ही पक्षाला निवडणूक लढवायची आहे आणि दोन्ही पक्षांन युती होणार नाही असं आधीपासूनच गृहीत धरून दोन्ही पक्षांन स्वतंत्र लढण्याची तयारी केली होती.

आतापर्यंत युती व्हावी यासाठी दोन्ही पक्षातील सर्व नेत्यांमध्ये तब्बल चार वेळा बैठका झाल्या. मात्र, त्या सर्व निष्फळ ठरत असल्याने आता दोन्ही पक्षांनी एकमेकांना अश्या पद्धतीने अल्टीमेटम देऊन युती बाबतचे आपले मनसूबे  जाहीर केले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 19, 2017 08:17 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close