19 जानेवारी : सोशल मिडीयावर पर्सनल गोष्टी टाकल्यामुळे काय परिणाम होतात याचं धक्कादायक उदाहरण पुण्यात घडलं आहे. घरगुती समस्या फेसबुकवर शेअर केल्याने संतापलेल्या पतीने पत्नीचा खून करून स्वत: गळफास घेतल्याची खळबळजनक घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील हडपसर येथे ही घटना घडली असून या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पुण्यातील हडपसर परिसरात राकेश आणि सोनाली गांगुर्डे हे पती-पत्नी राहत होतं. त्यांना मूल होत नव्हतं. सोनालीची त्याबाबत ट्रीटमेंट सुरु होती. पण या ट्रीटमेंटबद्दल सोनाली व्हॉट्स अॅप आणि फेसबुकवर तिच्या मित्रमैत्रीणींना सांगायची. याच कारणामुळे त्यांच्यात वारंवार वादावादीही व्हायची. त्या रागातूनच आपण हे कृत्य केल्याचं राकेशनं सुसाइड नोटमध्ये लिहिलं आहे. हडपसर पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
मुळचे नाशिकचे असलेले राकेश आणि सोनाली गेल्या तीन वर्षांपासून पुण्यात राहत होते. उच्चशिक्षित दाम्पत्याच्या अशा मृत्युमुळे हळहळ व्यक्त होतेय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा