S M L

राम गडकरींचा पुतळा तोडणाऱ्यांना नितेश राणेंकडून 5 लाखांचं बक्षीस

Samruddha Bhambure | Updated On: Jan 17, 2017 11:07 AM IST

राम गडकरींचा पुतळा तोडणाऱ्यांना नितेश राणेंकडून 5 लाखांचं बक्षीस

17 जानेवारी : इस्लामच्या नावाखाली फतवे काढणारे आणि त्यांना इनाम देणारे कट्टरतावादी अरब देशांमध्ये पहायला मिळतात. पण तीच परंपरा आता स्वत:ला पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रातही पडताना दिसतेय. कारण पुण्यातल्या संभाजी बागेतील राम गणेश गडकरींचा पुतळा तोडणाऱ्या चार गुंडांना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचा मुलगा नितेश राणे यांनी पाच लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे. विशेष म्हणजे नितेश राणे हे स्वत:ही काँग्रेसचे आमदार आहेत.

 काही दिवसांपुर्वी राम गणेश गडकरींनी 'राजसंन्यास' नाटकातून छत्रपती संभाजी राजेंची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप करत पुण्यातील संभाजी उद्यानातून त्यांचा पुतळा फोडून, मुठा नदीत फेकला होता. त्याच गुंडांना नितेश राणेंनी काळ तुळापुरात पाच लाख रूपायांचा चेक देऊन त्यांचा सत्कारही केला.

गेल्या वर्षी नितेश राणेंनी  तुळापूरमध्ये केलेल्या भाषणातच संभाजी बागेतील गडकरींचा पुतळा जो तोडेल त्याला पाच लाख रूपयांचं बक्षीस देण्याची घोषणा त्यांनी केली होती.  ती घोषणा  आपण पूर्ण करत असल्याचं नितेश राणेंनी म्हटलंय.

यावेळी नितेश राणे यांनी विनायक मेटे आणि राज ठाकरे यांच्यावरही जोरदार टिका केली. राज ठाकरेंना रात्री आठनंतर सगळं एक सारखंच दिसतं किंवा एकाचे चार दिसतात असं म्हणायलाही नितेश मागे हटले नाहीत.

Loading...

IBN लोकमतचा सवाल

  • पुतळा फोडणाऱ्या गुंडांना बक्षिसी देणं म्हणजे गुंडगिरी पोसणं नाही का?
  • पुतळा फोडायला सांगणं, नंतर बक्षिसी देणं ही सुद्धा गुंडगिरी नाही का?
  • गुंडांना बक्षिसी देणं काँग्रेसच्या आमदाराला शोभतं का? काँग्रेस कारवाई करणार का?
  • पुतळा फोडायला लावला म्हणून नितेश राणेंना सरकार आरोपी का करत नाही?
  • महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री म्हणून नारायण राणे मुलाच्या कृत्याचं समर्थन कसं करतील?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 17, 2017 09:22 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close