'नगरसेवक हरवला आहे',पुणेकरांचा अनोखा निषेध

'नगरसेवक हरवला आहे',पुणेकरांचा अनोखा निषेध

  • Share this:

3

15 जानेवारी : पुणेकर हे अजब रसायन आहेत. पुणेकरांच्या निषेधाची वाटही वेगळी असते. पुण्यातल्या शनिवार पेठेतल्या पाट्याही याचंच द्योतक म्हणावं लागेल. नगरसेवक हरवल्याच्या पाट्या शनिवार पेठेत झळकल्यात.

चिरंजीव नगसेवकास गेली पाच वर्ष आम्ही तुझी वाट पाहतोय. मतदारसंघ माता तुझी वाट पाहतेय. परत ये रागावणार नाही अशा आशयाच्या या पाट्या शनिवार पेठेत ठिकठिकाणी झळकतायेत.

शनिवार पेठेत सर्वत्र लावलेल्या काही पाट्या पोलिसांनी काढून टाकल्या. पण सगळ्याच पाट्या काढणं पोलिसांना जमलं नाही. नगरसेवक शोधण्यासाठी पुणेरी मतदारांनी ही अनोखी शक्कल लढवलीये.

शनिवार पेठेत सध्या भाजपचे नगरसेवक आहेत. पुणे जिंकण्यासाठी निघालेल्या भाजपच्या या नगरसेवकाच्या कामाच्या गायब पद्धतीने मतदार हैराण आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 15, 2017 05:37 PM IST

ताज्या बातम्या