लोक मतदान का करत नाहीत?

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jan 9, 2017 08:10 PM IST

लोक मतदान का करत नाहीत?

voting survey image

09 जानेवारी : 'मतदार यादीत माझं नाव नाही','माझ्या एका मताने काय फरक पडतो ?','आतापर्यंत मतदान केल्याने काही फरक पडला का ?','महापालिका निवडणुकांमध्ये मतदान करणार का?' या प्रश्नावर गोखले इन्स्टिट्यूटने घेतलेल्या या सर्व्हेमध्ये पुणेकरांनी सांगितलेली ही काही कारणं आहेत. मतदारांचा असा सर्व्हे करण्याची सूचना निवडणूक आयोगानेच गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेला दिली होती. त्यातून हे मुद्दे पुढे आलेत.

लोक मतदान का करत नाहीत ?

मतदार यादीत नाव नाही - 30 %

मी शहरातच नव्हतो - 23 %

Loading...

शहरात काय बदल झाला ? - 22 %

एका मताने काय फरक पडतो ?- 20 %

मतदार यादीतून नाव गायब - 20 %

राज्यात 10 महापालिकांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे राजकारण ढवळून निघालंय. पण मतदारांमध्ये मतदानासाठी किती उत्साह आहे याबद्दल पुण्यात हा सर्व्हे करण्यात आलाय. पुण्यामध्ये NIBM, विमाननगर, बालेवाडी, कोथरुड हे कमी मतदान होणारे भाग आहेत. हडपसर, अलका टॉकीज या वॉर्डांमध्ये जास्त मतदान होतं.

या सर्व्हेमध्ये पुण्यातल्या वेगवेगळ्या वयोगटातल्या नागरिकांशी संवाद साधण्यात आला.मतदानाबद्दलच्या प्रश्नांना पुणेकर नागरिकांनी उत्तरं दिलीच. त्याशिवाय स्वच्छ प्रतिमेचे, भ्रष्टाचारमुक्त लोकप्रतिनिधी हवे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केलीय. लोकप्रतिनिधींशी थेट संवाद साधता यायला हवा, असंही त्यांचं म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 9, 2017 07:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...