गडकरींचा पुतळा बसवला तर परिणामांना तयार राहा, संभाजी ब्रिगेडची धमकी

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 9, 2017 06:39 PM IST

गडकरींचा पुतळा बसवला तर परिणामांना तयार राहा, संभाजी ब्रिगेडची धमकी

sambhaji_briged09 जानेवारी : पुण्याच्या संभाजी उद्यानामध्ये संभाजी महाराजांचाच पुतळा बसवा राम गणेश गडकरींचा पुतळा बसवू नका अन्यथा कायदा सुव्यवसस्था बिघडली तर होणाऱ्या परिणामांना सरकार जबाबदार असेल असा इशारा आज संभाजी ब्रिगेडनं दिलाय.

मागच्या आठवड्यात 3 जानेवारीला पुण्यातील संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरींचा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी फोडला होता. त्यानंतर त्या चबुतऱ्यावर गडकरींचं तैलचित्र लावण्यात आलंय. आज संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन महापालिकेलाच इशारा दिलाय. त्या ठिकाणी पुतळा बसवू नये अन्यथा कायदा सुव्यवस्था बिघडल्यास त्याला जबाबदार महापालिका राहिल असं संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांनी सांगितलंय.

तसंच आठ वर्षांपूर्वी राष्ट्रवादीच्या तत्कालिन महापौर राजलक्ष्मी भोसले यांनी पुतळा हटवण्याची मागणी उद्यान अधीक्षकांकडे केल्याचा दावाही संभाजी ब्रिगेडनं केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 9, 2017 06:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...