S M L

मोदींना देश कळला नाही, सुप्रीम कोर्टाला काय कळणार -राज ठाकरे

Sachin Salve | Updated On: Jan 2, 2017 08:29 PM IST

मोदींना देश कळला नाही, सुप्रीम कोर्टाला काय कळणार -राज ठाकरे

02 जानेवारी :  मत मागतांना प्रत्येक वेळा भाषा आणि धर्म वापरला जातो असं काहीही घडत नाही. हा मुळात हा अस्मितेचा प्रश्न आहे. एकदा देशाची परिस्थिती तपासून पाहा असं सांगत सुप्रीम कोर्टाचा निर्णय मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी धुडकावून लावला. तसंच नोटबंदीचा प्रयत्न फसला हे मोदींच्या लक्षात आलंय म्हणून घोषणाबाजी केली अशी टीकाही राज ठाकरे यांनी केली.

पुण्यात मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचं राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. यावेळी राज ठाकरे यांनी प्रचाराचा नारळ फोडत भाजप सरकार आणि सुप्रीम कोर्टावर टीका केली.  सुप्रीम कोर्टात ही माणसं जातात कोण ? ते काही कळत नाही. परराज्यातून येणाऱ्या माणसांची संख्या खूप असते. ती इथं येता आणि भाषा स्वीकारत नाही. त्यामुळे संघर्ष निर्माण होतो. राज्यात निर्माण होणारा रोजगार भूमिपूत्रांना मिळालाच पाहिजे. पण असे विषय जेव्हा सुरू होता. तेव्हा भाषेचा प्रश्न येतो. विनाकारण असे विषय काढले जातात. पण, एकदा वस्तूस्थिती तपासून पाहा. ती न तपासता निर्णय दिले जातात. हे आम्ही कसे मानायचे ? बाकीच्या राज्यांमध्ये ज्यांची त्यांची भाषा वापरण्यास प्राध्यान्य दिलं जातं. आम्ही त्यासाठी आंदोलनं केलं होतं. असले प्रकार होता म्हणून आम्हाला बोलावं लागतं. म्हणून काय आम्हाला हे करण्याची हौस आली नाही. पण, वस्तुस्थिती ठेवून निर्णय घ्या इथं मोदींना देश कळला नाही तिथे सुप्रीम कोर्टाला काय कळणार असंही राज ठाकरे म्हणाले.

'स्टेशनला काय राम मंदिरांचं नाव देताय'राम मंदिरावर इतका मोठा संघर्ष झाला. पण त्यांना अजून राम मंदिर उभारता येत नाही. एका स्टेशनला नाव देतात. पुर्ण सत्ता तुमच्या हातात आहे मग मूळ राम मंदिर का होत नाही ? , ज्या राममंदिरावर इतके खासदार निवडून आणले ते राम मंदिर बाजूला पाडलं अशी टीका राज ठाकरेंनी केली.

'शिवस्मारक अशक्य'

भाजपला घोषणा करण्याची आवड आहे. शिवस्मारकाचं उद्घाटन झालंय. पण ते स्मारक कसं बांधायचं याचा काहीही नेम नाही. स्टॅच्यू  अॅाफ लिबर्टीपेक्षा 2 इंच स्मारक उंच आणणार आहे.

Loading...

पण याआधी इतकं मोठं स्मारक उभारणारा कोण शिल्पकार आहे का ? समुद्रात भर टाकून स्मारक कसं होणार ? त्यापेक्षा गड किल्ल्यावर खर्च केला तर येणाऱ्या पिढीला त्याचा फायदा होईल. आपला राजा कसा होता त्यांचा इतिहास काय होता याची माहिती मिळेल. या सरकारला फक्त घोषणा करण्याची सवय लागलीये अशी टीकाही राज ठाकरेंनी केली.

'नोटबंदी फसला मोदींना कळाला'

नोटबंदीवर पंतप्रधान मोदी बोलायला तयार नव्हते. काल बोलले काय तर म्हणे, गर्भवती महिलांना 6 हजार रुपये देणार. ही कोणती पद्धत आहे लोकसंख्या वाढवायची ?, 30 तारखेनंतर काय होणार अशी गर्जना करताय. पण त्यावर ते काहीच बोलले नाही. उलट नोटबंदीचा प्रयत्न फसलाय हे त्यांच्या बॅाडी लँग्वेजवरुन दिसून येत होतं अशी टीकाही राज ठाकरे यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 2, 2017 08:29 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close