16 नोव्हेंबर : नोटबंदीच्या निर्णयानंतर पुणे महापालिकेमध्ये 100 कोटींचा कर जमा झालाय. पुणेकरांनी जुन्या नोटांच्या स्वरूपात हा कर भरला. याआधी महापालिकेने कर भरण्याच्या नोटिसा पाठवल्या होत्या. पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. नोटबंदीचा निर्णय मात्र यावर जालीम उपाय ठरलाय. एवढ्या कमी दिवसांत विक्रमी कर गोळा होण्याची पुणे महापालिकेची ही पहिलीच वेळ आहे.
राज्यभरात सगळ्याच महापालिका आणि नगरपालिकांनी नागरिकांना कर भरण्याचं आवाहन केलं होतं. या करवसुलीमध्ये पुणे आघाडीवर आहे. नागरिकांनी घरपट्टी आणि पाणीपट्टीचे 100 कोटी रुपये महापालिकेकडे जमा केलेत.
सोमवारी गुरुनानक जयंतीची सुटी असूनही महापालिकांच्या कार्यालयात कराची रक्कम स्वीकारली जात होती. शहरात ठिकठिकाणी नागरिकांना घरपट्टी, पाणीपट्टीची रक्कम भरण्याचं आवाहन करण्यात येत होतं. त्याला नागरिकांनी जोरदार प्रतिसाद दिला. त्यामुळे महापालिकांच्या कार्यालयात नोटांचे ढीग जमले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv