S M L

छोट्या पुणेकराची मोठी कमाल, साकारला गुगलचा डुडल

Sachin Salve | Updated On: Nov 14, 2016 05:33 PM IST

छोट्या पुणेकराची मोठी कमाल, साकारला गुगलचा डुडल

पुणे, 14 नोव्हेंबर : आज 14 नोव्हेंबर म्हणजेच बालदिन.आजच्या दिवशी गुगल इंडियाच्या पेजवर जो डुडल दिमाखात मिरवतोय तो बनवलाय पुण्यातील एका 11 वर्षीय चिमुरडीने.

भारतात घेतल्या गेलेल्या 'डुडल फॉर गुगल' ह्या स्पर्धेत देशभरातून अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. पुण्यातील बालेवाडी येथील विब्ग्योर हाय स्कुलमध्ये सहाव्या इयत्तेत शिकणा-या अन्विता प्रशांत तेलंग हीने त्या स्पर्धेत पहिला क्रमांक पटवला.आजचा पूर्ण दिवस बालदिन साजरा करण्यासाठी तिचा डुडल गुगलच्या भारतीय होमपेजवर असणार आहे.

देशभरातून 50 पेक्षा जास्त शहरांतून स्पर्धेसाठी प्रवेशिका आल्या होत्या. त्यातील डुडल्सची कलात्मकता,कल्पकता,विषयाची निवड आणि जागतिक पोच,सादरीकरण याआधारे परिक्षण केले गेले आणि अन्विताचे डुडल सर्वोत्कृष्ट म्हणून निवडला गेला.


अन्विताच्या या डुडलमध्ये तिच्या दृष्टीतील समृद्ध-संपन्न आणि सुजलाम्-सुफलाम् देश दिसून येत आहे. ती म्हणते 'वेगासोबत धावताना जग लहान गोष्टींचा आनंद घ्यायला विसरला आहे. तेच मला माझ्या डुडलमध्ये दाखवून द्यायचे आहे .मी यात वास्तवात आनंदी राहण्याचा आणि कशाचाही विचार न करण्याचा संदेश दिला आहे.ज्यातून मला स्वत:लाही आनंद मिळतो.'

2009 पासून गुगल भारतात ही स्पर्धा घेत आहे. या स्पर्धेला दरवर्षी मोठ्या प्रमाणावर एन्ट्रीज् येतात आणि त्यातून जागतिक स्तरावरचे परिक्षक सर्वोत्तम डुडल्सची निवड करतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 14, 2016 05:33 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close