पुण्यात पाचही मानाच्या गणपतींचे विसर्जन

 पुण्यात पाचही मानाच्या गणपतींचे विसर्जन

  • Share this:

pune_kasba

15 सप्टेंबर : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुण्यात पाचही मानाच्या गणपतीना मोठ्या भक्तीभावाने निरोप देण्यात आला. संध्याकाळी पाच गणपतींचं विसर्जन पार पडलंय. कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा गणपतीनी पुणेकरांचा निरोप घेतलाय.

पुणेरी ढोल...लेझीम पथक..सळसळत्या तरुणाईचा उत्साह आणि अखंड पुणेकरांची श्रद्धा..अशा भक्तीमय वातावरणात पुणेरी मानाचे गणपती. देखण्या पारंपरिक आणि शिस्तबद्ध मिरवणुका हे पुण्याच्या मिरवणुकांचं खास वैशिष्ट्य. सकाळी मानाच्या गणपतींच्या मिरवणुकांना टिळक पुतळ्यापासून सुरूवात झाली.

खास पुणे ढोल ताशाच्या गजरात मानाचे गणपती निघाले. पुण्यातला मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीची पालखीतून मिरवणूक निघाली. गणेशोत्सव सुरू झाल्यापासून पुण्याचं ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीला मिरवणुकीत टिळकांनी अग्रस्थान दिलं. तर मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरीची पालखीतून मिरवणूक काढली गेली. या मंडळाचं यंदाचं 124 वं वर्ष होतं. मानाचा तिसरा गणपती- गुरुजी तालीम. हे मंडळ पुण्यातलं सगळ्यात जुनं मंडळ समजलं जातं.

तर मानाचा चौथा गणपती म्हणजे तुळशीबाग गणपती. मोठ्या दिमाखात या गणपतीची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती. ढोल-ताशांची पथकं ही या मिरवणुकीची वैशिष्ट्य ठरली. आणि शेवटचा मानाचा पाचवा केसरीवाड्याच्या गणपती. मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचं विसर्जन पावसामुळे दुपारी चारच्या सुमाराला झालं, त्यानंतर तांबडी जोगेश्वरीच्या गणपतीचं आणि गुरुजी तालीम गणपतीचं विसर्जन झालं. मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीचंही विसर्जन झालं. आणि सर्वात शेवटी दगडूशेठ गणपतीची मिरवणूक मात्र रात्री उशीरा सुरू राहणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: September 15, 2016, 7:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading