नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचा वीरेंद्र तावडेच खरा सूत्रधार

  • Share this:

07 सप्टेंबर : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येचा वीरेंद्र तावडे हा सूत्रधार आणि सारंग अकोलकर आणि विनय पवार मारेकरी असल्याची माहिती समोर आलीये. सीबीआयनं पुणे कोर्टात दाखल केलेल्या आरोपपत्रात ही माहिती देण्यात आलीये. वीरेंद्र तावडे सध्या कोल्हापूर एसआयटीच्या ताब्यात आहे. तर सारंग अकोलकर आणि विनय पवार हा फरार आहे.virendra_tawade

अंधश्‌्ा्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक डॉ.नरेंद्र दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. तीन वर्षांच्या तपासानंतर वीरेंद्र तावडेला चौकशीअंती अटक करण्यात आली होती. दाभोलकर हत्येप्रकरणी ही पहिलीच अटक होती. तावडेच्या अटकेनंतर चौकशीला सुरूवात झाली आणि त्यातून तावडेनं धक्कादायक खुलासे करत आरोपाची कबुलीच दिली. तावडे आणि गोवा स्फोटातील आरोप सारंग अकोलकर यांनी दाभोलकरांच्या हत्येचा कट रचल्याचं उघड झालं. दोघांच्या ई-मेल्सचा डाटा सीबीआयच्या हाती लागला होता. सीबीआयने दाभोलकरांच्या मारेक-यांचे रेखाचित्राची तावडेकडून ओळख पटवून घेतली. त्याने हे रेखाचित्र सारंग अकोलकरचे असल्याचं सांगितलं होतं. सारंग अकोलकर सध्या फरार आहे. तो 2009 च्या गोवा स्फोटातला आरोपी आहे. सारंग हा सनातनचा साधक आहे. दाभोलकर यांच्या हत्येनंतर सुरुवातीपासून सनातनचा हात असल्याचा संशय होता.

तावडेच्या चौकशीनंतर सीबीआयने आज पुणे कोर्टात आरोपपत्र दाखल केलंय. या आरोपपत्रात वीरेंद्र तावडेच खरा सुत्रधार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. दाभोलकर यांच्यावर ज्या दोन मारेकऱ्यांनी गोळ्या झाडल्या होत्या ते दोघे  सारंग अकोलकर आणि विनय पवार असल्याचं स्पष्ट झालंय. तर गोवा बॉम्बस्फोटप्रकऱणी सारंग अकोलकरचा शोध सुरू आहे तर 2009 पासून विनय पवार फरार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 7, 2016 03:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...