'स्कूल चले हम' असं ?

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Aug 7, 2016 06:53 PM IST

'स्कूल चले हम' असं ?

हा प्रवास एक दोन दिवसांचा नाही तर वर्षभर करावा लागतोय तोही दिवसांतून किमान दोन वेळा तरी. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात आदिवासी भागातल्या आंबेगव्हाण च्या 70 लहान मुलां- मुलींना आणि सुमारे 650 लोकांना कशी करावी लागतीये.

[wzslider]मु. पो. आंबेगव्हाण....पुणे आणि नगर जिल्ह्याच्या सरहद्दीवरील सुमारे 3 हज़ार लोकसंख्या असलेलं गाव..गावा जवळून बारमाही वाहणारी मांडवी नदी...याच नदीच्या पलीकडे आहे. धावशी,मोरदरा, आणि गायकरवस्ती. सुमारे 70 शाळकरी लहान मुलं आणि 650 ग्रामस्तांना हा असा "रिवर क्रॉसिंग" चा जीवघेणा अनुभव रोजच घ्यावा लागतोय

नदीच्या एका बाजूला उंच आंब्याचे झाड आणि दुसर्‍या बाजूला सपाट भागात रोवलेला उंच लोखंडी पोल. या दोघांना जोडणारा आहे तो एक वायर रोप आणि कप्पी. एका बाजूला 2 ते 3 माणसे उभी राहतात आणि मग चौकोनी लाकडाचा तयार केलेला पाळणा या वायर रोप ला

जोडून ही माणसे हा पाळणा अलीकडे आणि पलीकडे ओढतात. यावरून मग शाळकरी मुलं आणि कामाला जाणार्‍या मजूर महिला आणि पुरुष प्रवास करतात.

याबाबत गावक-यांनी शासन दरबारी अनेकदा पाठपुरावा केला. लोकप्रतिनिधींनी आश्वासनंही दिली मात्र अद्याप यश मात्र आलेलं नाहीये.

Loading...

एकीकडे देशाला स्वातंत्र्य मिळून तब्बल 69 वर्ष होत आली आहेत. मात्र आंबेगव्हाण गावच्या आदिवासी मुलांना शिक्षणाच्या हक्कासाठी असा जीवघेणा प्रवास करावा लागतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 7, 2016 06:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...