पुण्यातून आयसिसच्या संपर्कात असलेले 5 संशयित एटीएसच्या ताब्यात

पुण्यातून आयसिसच्या संपर्कात असलेले 5 संशयित एटीएसच्या ताब्यात

  • Share this:

ISISI Attackपुणे, 16 जुलै : दहशतवादी संघटना आयसिसशी संबंध असल्याच्या संशयावरून पुण्यातून 5 विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आलंय. पुणे एटीएसनं ही कारवाई केलीये.

कोंढव्यातल्या कौसर बाग परिसरातील अमन व्हिला इमारतीतून आखाती देशातील काही तरूण राहत होते. एक महिन्यापासून पोलीस आणि एटीएसच्या त्यांच्यावर नजर ठेवून होते. दोन दिवसांपूर्वीच बीडमध्ये धाडसत्रानंतर पोलिसांना मिळेल्या माहितीनुसार या पाचही विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आलं. ताब्यात घेतलेल्या पाच जणांची एटीएसकडून कसून चौकशी सुरू आहे.

या पाच जणांचा परभणीतून ताब्यात घेतलेल्या नासेर चाऊसशी काही कनेक्शन आहेत का याचा पोलीस तपास करीत आहेत. दोन दिवसांपूर्वी परभणीतून नासेरला एटीएसने अटक केली होती. नासेरच्या घराची झाडाझडती घेतली असता त्याच्या घरातून स्फोट सापडली होती. ईदच्या दरम्यान घातपात करण्याचा प्रयत्नात असल्याची माहितीही समोर आली. त्यामुळे एटीएसने तपासाची चक्र फिरवली असून पुण्यातून 5 जणांना ताब्यात घेतलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: July 16, 2016, 1:49 PM IST

ताज्या बातम्या