'गोल्डनमॅन' दत्तात्रय फुगेंची दगडाने ठेचून हत्या

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 15, 2016 12:10 PM IST

'गोल्डनमॅन' दत्तात्रय फुगेंची दगडाने ठेचून हत्या

पिंपरी-चिंचवड, 15 जुलै : तब्बल 1 कोटींचा सोन्याचा शर्ट शिवल्यामुळे 'गोल्डनमॅन' अशी ओळख मिळवणारे दत्तात्रय फुगे यांची हत्या करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दत्तात्रय फुगेंची गुरुवारी रात्री दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.goldman_datarya_fuge

पिंपरी चिंचवडमधील गोल्डमॅन दत्तात्रय फुगेंची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली.. दिघीमध्ये गुरुवारी रात्री साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली. वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून घरी येताना त्यांच्यावर हल्ला झाला. चिटफंड व्यवसायाच्या घोटाळ्यातून फुगेची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे.

या प्रकरणी चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यातील एक दत्तात्रय यांचा पुतण्या आहे. दत्तात्रय फुगेची सोन्याच्या शर्टची देशभरात चर्चा होती. इतकंच नाही तर फुगेची गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली होती. सर्वांत महागडा सोन्याचा शर्ट खरेदी करण्याचा विक्रम दत्तात्रय फुगेंच्या नावावर नोंदवण्यात आला होता. दरम्यान, फुगेच्या पत्नी सीमा फुगे या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 15, 2016 12:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...