सीबीआयने उभा केलेला साक्षीदार भ्रष्टाचारी - अभय वर्तक

सीबीआयने उभा केलेला साक्षीदार भ्रष्टाचारी - अभय वर्तक

  • Share this:

abhay-vartak

पुणे – 17 जून : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणात सीबीआयने उभा केलेला साक्षीदार भ्रष्टाचारी असल्याचा आरोप सनातन संस्थेने केला आहे. तसंच या प्रकणात सर्व गोष्ट आशिष खेनता याला कशा माहिती पडतात आणि त्यानंतरच सीबीआय कसे छापे मारते?, असा सवाल 'सनातन'ने व्यक्त केला आहे.

याप्रकरणात सनातनचा साधक डॉ.वीरेंद्र तावडे अटकेत असून, तो सध्या सीबीआय कोठडीत आहे. या सर्व प्रकरणात पुन्हा एकदा सनातनचे नाव पुढे आल्याने अभय वर्तक यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी, आमच्या संस्थेला जाणूनबूजून टारगेट केलं जातं असल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर दाभोलकर यांच्या हत्ये प्रकरणात सीबीआयने उभा केलेला मुख्य साक्षीदार संजय साडवीलकर हा भ्रष्टाचारी असल्याचा आरोपही सनातन संस्थेने केला.

दरम्यान, या हत्या प्रकरणात पुण्याचे माजी पोलीस अधिकारी सीबीआयच्या रडारवर आहेत. दाभोलकरांच्या हत्येवेळी संबंधित पोलीस इन्स्पेक्टर सतत वीरेंद्र तावडेच्या संपर्कात असल्याची सीबीआयच्या सुत्रांनी माहिती दिली. वीरेंद्र तावडेच्या अनेक फोन रेकॉर्डमधून आणि ई-मेलच्या मजकुरातून हा खुलासा झाल्याचं सांगण्यात आलं. ई मेलमधून वीरेंद्र तावडेने अनेक की वर्ड ही वापरल्याचं उघड झालं आहे. दाभोलकर आणि पानसरे हत्या प्रकरणात एकच हत्यार वापरलं गेल्याचा सीबीआयचा कयास आहे. त्याने दिलेल्या माहितीवरुन वेगवेगळ्या प्रकाराने तपास सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 17, 2016 04:23 PM IST

ताज्या बातम्या