दाभोलकर हत्येप्रकरणी विरेंद्र तावडेला आज कोर्टात हजर करणार

दाभोलकर हत्येप्रकरणी विरेंद्र तावडेला आज कोर्टात हजर करणार

  • Share this:

narendra dabholkarपुणे - 11 जून : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी शुक्रवारी रात्री विरेंद्र तावडेला सीबीआयनं अटक केली. तावडेला आज दुपारी दीडनंतर सुट्टीच्या कोर्टात हजर करण्यात येणार आहे. वीरेंद्रचा खुनाचं षड्‌यंत्र रचण्यात सहभाग होता, असा सीबीआयला संशय आहे. सीबीआचे तपास अधिकारी एस आर सिंग यांनी ही माहिती आमच्या प्रतिनिधीला दिली.

वीरेंद्र हा सनातनचा साधक आहे आणि हिंदू जनजागृती समितीशीही संबंधित आहे, असं कळतंय. तावडे हा डॉक्टर असून तो कान नाक घसा तज्ज्ञ आहे. गेल्या आठवड्यात सीबीआयनं वीरेंद्र आणि सारंग आकोलकर यांच्या घरांवर छापे टाकले होते. त्यानंतर हे दोघं ईमेलनं संपर्कात होते. सीबीआयनं काल वीरेंद्रला चौकशीसाठी बोलावलं आणि त्याला अटक केली. कॉम्रेड गोविंद पानसरे आणि डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात अटक केलेल्या व्यक्ती सनातनशी संबंधित आहे, हा एक समान दुवा आहे.

कोण आहे वीरेंद्र तावडे ?

- तावडे मूळचा कोकणातल्या देवगड तालुक्यातील

- तावडे हा कान-नाक-घसा तज्ज्ञ

- पत्नीही वैद्यकीय व्यवसायामध्ये

- सनातनचा साधक, हिंदू जनजागरण समितीशी संबंध

- पनवेलमध्ये सनातनच्या आश्रमाजवळच तावडेचं घर

- तावडे जवळपास आठ वर्षं सातार्‍यात होता

दाभोलकर हत्येप्रकरणाचा घटनाक्रम

- 20 ऑगस्ट 2013 - पुण्यातील शिंदे पुलावर दाभोलकरांची हत्या

- सनातन संस्था आणि जनजागरण समितीवर संशय

- 5 महिन्यांनी मनीष नागोरी, विकास खंडेलवालला अटक

- पोलिसांकडून तपासात फार प्रगती नाही

- सीबीआयला तपास देण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल

- 9 मे 2014 ला तपास सीबीआयकडे वर्ग

 - 1 जूनला सीबीआयच्या पुण्यातील छाप्यात मिळाले धागेदोरे

- सारंग अकोलकर आणि तावडे यांच्या घरावर छापे

- छाप्यात काही संशयास्पद वस्तू CBI ला सापडल्या

- छाप्यानंतर तावडे आणि अकोलकरचा ई-मेलवरून संपर्क

- 10 जूनला तावडेला चौकशीसाठी बोलावलं

- चौकशी पूर्ण झाल्यावर वीरेंद्र तावडेला अटक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: June 11, 2016, 1:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading