महामार्गावर कंत्राटदाराला सुरक्षेच्या उपाययोजना देणे ठरणार बंधनकारक !

महामार्गावर कंत्राटदाराला सुरक्षेच्या उपाययोजना देणे ठरणार बंधनकारक !

  • Share this:

09 जून : महामार्गांवर भविष्यात रस्त्यांच्या कामाचं कंत्राट देताना सुरक्षेच्या उपाययोजना करणे बंधनकारक ठरणार आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

mumbai_express3सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज (गुरुवारी) सततच्या होणार्‍या अपघातांच्या पार्श्वभूमीवर मुंबई -पुणे एक्स्प्रेसवेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी रस्ता सुरक्षा परिषदेच्या अधिकारात एक्स्प्रेस वेवरची गस्त वाढवली आहे.

रात्री आणि दिवसा 29 टीम्स गस्त घालणार, तसंच 6 महिन्यांत कॅमेरे, स्पीडगन्स, कंट्रोल रुम्सची व्यवस्थाही करणार असल्याचं सांगण्यात आलंय. भविष्यात रस्त्यांच्या कामाचं कंत्राट देताना सुरक्षेच्या उपाययोजना करण बंधनकारक ठरणार आहे. तसंच अवजड वाहनाना दंडापायी दुप्पट रक्कम मोजावी लागणार आहे. याची अंमलबजावणी लवकरच होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: June 9, 2016, 9:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading