दहावीच्या निकालात मुलींची बाजी, कोकण विभाग ठरला अव्वल

दहावीच्या निकालात मुलींची बाजी, कोकण विभाग ठरला अव्वल

  • Share this:

hsc-ssc-result-2015

पुणे - 06 जून : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2016 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज (सोमवारी) जाहीर करण्यात आला. राज्याच्या निकालाची टक्केवारी 89.56 टक्के इतकी असून, तर 96.56 टक्क्यांसह कोकण विभागाने पुन्हा एकदा बाजी मारली असून, तर लातूर विभागाचा निकाल सगळ्यात कमी म्हणजे 81.54 टक्के इतका लागला आहे.

 तर नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनीच निकालात बाजी मारली असून, 91.41 टक्के मुली परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत. तर मुलांचा निकाल 87.98 टक्के इतका लागला आहे.  विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजल्यापासून आपला निकाल ऑनलाइन पाहता येणार आहे.

दहावीचा विभागनिहाय निकाल:

  • कोकण (सर्वात जास्त) - 96.56%
  • पुणे- 93.30 टक्के,
  • कोल्हापूर -93.89 टक्के,
  • मुंबई 91.90 टक्के,
  • नागपूर- 85.34 टक्के,
  • अमरावती - 84.99 टक्के,
  • औरंगाबाद 88.05- टक्के,
  • नाशिक- 89.61 टक्के,
  • लातूर (सर्वात कमी) - 81.54 टक्के

या वेबसाईटवर पाहा दहावीचा निकाल

या निकालाची मूळ प्रत येत्या 15 जूनला दुपारी 3 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेमध्ये उपलब्ध करून दिलं जाणार आहे. तसंच 18 जुलैला होणार दहावीची फेरपरीक्षा घेण्यात येणार असल्याचं मंडळाकडून सांगण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: June 6, 2016, 12:45 PM IST

ताज्या बातम्या