डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी सनातन साधकांच्या घरांवर छापे

डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी सनातन साधकांच्या घरांवर छापे

  • Share this:

narendra dabholkar2133421

01 जून : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सीबीआयने पुणे आणि पनवेलमध्ये छापा टाकला आहे. पुण्यातील सनातन संस्थेचा साधक सारंग अकोलकर आणि डॉ. विरेंद्र सिंग तावडे यांच्या घरांवर सीबीआयने आज छापा मारला. त्यामुळे सनातन पुन्हा सीबीआयच्या कचाटयात अडकण्याची शक्यता आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सीबीआयने पुणे आणि पनवेलमध्ये छापा टाकला आहे. पुण्यातील सनातन संस्थेचा साधक सारंग अकोलकर याच्या घरी सीबीआयने छापेमारी केली आहे. तर पनवेलमध्ये विरेंद्र तावडे यांच्या घरी धाड टाकण्यात आली आहे.

पोलिसांनी यापूर्वीही डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमागे सनातन संस्थेच्या कार्यकर्ते असल्याचा संशय व्यक्त केला होता. आता सीबीआयनेही सनातनच्या साधकांच्या घरी छापेमारी केल्यामुळे सनातन संस्थेवरील संशय बळावला आहे. दरम्यान, मात्र या धाडसत्रात सीबीआयच्या हाती काय लागलं हे अद्याप कळू शकलेलं नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: June 1, 2016, 9:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading