ग्लॅमर्स दुनियेचा भयावह चेहरा,सिगारेटचे चटके देऊन मॉडेलवर गँगरेप

ग्लॅमर्स दुनियेचा भयावह चेहरा,सिगारेटचे चटके देऊन मॉडेलवर गँगरेप

  • Share this:

पुणे - 11 एप्रिल : लाईट, कॅमेरा आणि ऍक्शन...ग्लॅमर्स दुनियाचा हा झगमगाट प्रत्येकांना हवाहवासा वाटतो. पण, या दुनियेचा एक भयावह चेहरा समोर आलाय. दिल्लीच्या एका मॉडेलवर पुण्यात अमानुष अत्याचार करण्यात आले. मारहाण, बलात्कार आणि कौर्याची सीमा म्हणजे या तरुणीला सिगारेटचे चटके देऊन जखमी करण्यात आलं. अंगावर शहारे आणणार्‍या या घटनेतील पीडितने तब्बल दीड महिना हे अत्याचार सहन केले.pune_modal

बॉलिवूडच्या या ग्लमर्स दुनियेत एका मॉडेलने 'मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हुँ'चं स्वप्न उराशी बाळगलं. पण, चुकीच्या लोकांच्या संपर्कात आल्यामुळे या तरुणीला आपलं आयुष्य नरक यातनेत भोगावं लागलं. ही मॉडेल एका जाहिरातीत काम करत होती. चित्रपटात संधी देतो असं सांगून तिला पुण्यात बोलवण्यात आलं. आपल्या स्वप्नाला उभारी मिळेल या भाबड्या आशेनं तिने पुणे गाठलं. पण, पुण्यात आपल्यासोबत काय होणार याची पुसटशी कल्पना सुद्धा नव्हती. पुढे जे काही घडलं ते अत्यंत भयावह आणि माणुसकीला काळीमा फासणारं होतं. या मॉडेलला पुण्यात एका रुममध्ये ठांबून ठेवण्यात आलं आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार आणि अमानुष मारहाण करण्यात आली.

पीडित मॉडेलने दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एका महिलेनं संपर्क साधून चित्रपटात काम देण्याची ऑफर दिली होती. त्या महिलेच्या सांगण्यावरुन फेब्रुवारीमध्ये मी पुण्यात पोहचले. तिथे ऑडिशन घेण्यात आली त्यावेळी चार लोकांची ओळख करून देण्यात आली. या चारही जणांनी शारिरिक संबंध ठेवण्याच्या शर्तीवर चित्रपटात काम देण्यात येईल असं सांगितलं. याला पीडित मॉडेलने विरोध केला. पण, या चारही नराधमांनी पीडित मॉडेलला मारहाण केली. त्यानंतर तिला नशेचं औषध देऊ बेशुद्ध केलं. या चारही नराधमांनी पीडित मॉडेलला बेल्टाने बेदम मारहाण केली आणि सिगारेटचे चटके दिले. कौर्याची सीमा म्हणजे या मॉडेलच्या गुप्तांगालाही सिगारेटचे चटके देण्याचा प्रयत्न केला गेला.

अंगावर शहारे आणणार्‍या या भयावह घटनेतून या मॉडेलची सुटका एका तरुणीने केली. ही तरुणीही या महिलेच्या भुलथापाला बळी पडली होती. ही तरुणी मागील वर्षभरापासून या चार नराधमांच्या तावडीत सापडली होती. या मॉडेलवर झालेले अत्याचार पाहुन दोघींनीही हिंमत करून 15 मार्च रोजी पुण्यातून आपली सुटका करून घेतली आणि दिल्ली गाठली.

आपल्यासोबत झालेले अत्याचार हे जर लोकांना कळाले तर आपली समाजात आपल्याबद्दल काय बोललं जाईल या भीतीने या दोघींनी तक्रार करण्यास पुढे आल्या नाहीत. घरीच राहुन या दोघींनी आपल्यावर उपचार सुरू केले. काही दिवसांच्या उपचारानंतर हिंमत करून या दोन्ही तरुणींनी दिल्ली पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला. आणि 23 मार्चला कोटला मुबारकपुर स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात भादंवी कलम 323,328, 354(अ), 354(ब),506,34 नुसार गुन्हा दाखल केला. ही घटना पुण्यात घडली असल्यामुळे दिल्ली पोलिसांनी ही तक्रार पुणे पोलिसांकडे सुपूर्द केली. दिल्ली पोलिसांनी या तरुणींची वैद्यकीय तपासणी केली आणि बलात्काराचा गुन्हाही दाखल केलाय. पीडित तरुणींनी पुणे पोलिसांना विचारणा केली असता पुणे पोलिसांनी अशी कोणतीही तक्रार दिल्ली पोलिसांकडून वर्ग करण्यात आली नाही अशी माहिती दिली. पोलिसांकडून आपल्याला न्याय मिळणार नाही असं समजून या मॉडेलने आत्महत्येचाही प्रयत्न केला. जर आम्हाला न्याय मिळणार नसले तर जिंवत राहुन काय फायदा अशी व्यथा या मॉडेलने मांडलीये. आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी या दोन्ही तरुणींनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: April 11, 2016, 10:12 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading