पुण्यात पुन्हा दुचाकी जळीतकांड, 33 वाहने भस्मसात

पुण्यात पुन्हा दुचाकी जळीतकांड, 33 वाहने भस्मसात

  • Share this:

पुणे – 29 मार्च : पुण्यात दुचाकी आणि चारचाकी वाहनांना आग लागण्याचे सत्र सुरू आहे. पुणे आणि परिसरात गेल्या 24 तासांत तीन वेगवेगळ्या ठिकाणी दुचाकी वाहनांना आग लागण्याची घटना घडल्या आहेत. गणेश पार्क सोसायटीत तळमजल्यावर लावलेल्या दुचाकी आणि मोटारींना अचानक आग लागली. या आगीत 3 मोटारी आणि  15 दुचाकी जळाल्या. त्यानंतर सकाळी सहकारनगर पोलीस ठाण्याच्या आवारात लावलेल्या वाहनांना आग लागल्याची घटना घडली. तिथे लागलेल्या आगीत 11 चारचाकी, 2 तीनचाकी आणि 2 दुचाकी अशी 15 वाहने भस्मसात झाली. पिंपरीतल्या चिखली परिसरातल्या साई पार्क सोसायटीत ही जाळपोळ झाली आहे.

Pune Fire2131

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज चौकाजवळ असलेल्या गणेश पार्क सोसायटीच्या आवारात लावलेल्या 18 गाड्यांना आग लागल्याची माहिती नागरिकांकडून मिळाली. यामध्ये तीन मोटारी आणि 15 दुचाकींचा समावेश आहे. आगीचे लोट इमारतीच्या मजल्यांपर्यंत पोहोचले होते. अग्निशामक दलाने पाण्याचा फवारा करून आग आटोक्यात आणली. आग कोणी लावली याचा शोध घेण्यात येतो आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे चित्रीकरणही तपासण्यात येते आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यानंतर सहकारनगर पोलीस ठाण्याच्या समोर लावलेल्या वाहनांना सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास आग लागली. ही वाहने निकामी झाली असून त्यांच्या मालकांचा शोध न लागल्यामुळे ही बेवारस वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवण्यात आली होती. आगीत अकरा चारचाकी, दोन तीनचाकी आणि दोन दुचाकी वाहने जळाली. सहकारनगर पोलीस ठाण्याच्या आवारात लावलेली वाहने उष्णतेमुळे पेटली असावीत, अशी शक्यता आहे.

Loading...

तर पिंपरीतही काही वाहनांची जाळपोळ झालीये. चिखली परिसरातल्या साईं पार्क सोसायटीच्या पाकीर्ंगच्या जागेत उभी असलेली 3 चारचाकी वाहनं जाळण्यात आली आहे. कोणीतरी मुद्दाम या गाड्या जाळल्याचा स्थानिकांचा संशय व्यक्त केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 29, 2016 12:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...