पुणे रेल्वे स्टेशन देशातलं सर्वात अस्वच्छ स्टेशन !

पुणे रेल्वे स्टेशन देशातलं सर्वात अस्वच्छ स्टेशन !

  • Share this:

pune_station233पुणे - 22 मार्च : पुणे तिथे काय उणे...असं मोठ्या अभिमानाने पुणेकर सगळ्यांना सांगता...पण,पुणेकरांच्या या अभिमानाला आता चांगलाच 'डाग' लागलाय. पुण्याला देशासाठी जोडणार पुणे रेल्वे स्थानक देशातलं सर्वात अस्वच्छ असल्याचा ठप्पा पडलाय.

स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत आयआरसीटीसीने केलेल्या सर्वेक्षणात पुणे जंक्शन देशातलं सर्वात अस्वच्छ रेल्वेस्थानक ठरलं आहे. तर सूरत हे देशातलं सर्वांत स्वच्छ रेल्वेस्थानक असल्याची घोषणा करण्यात आली. ए 1 आणि ए गटातल्या स्वच्छ रेल्वेस्थानकांच्या यादीत महाराष्ट्रातल्या सोलापूर,मुंबई सेंट्रल, दादर, कल्याण आणि नाशिक रोड या पाच रेल्वेस्थानकांचा समावेश आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत रेल्वेच्या आयआरसीटीसीने टीएनएस इंडिया प्रा. लिमिटेड या कंपनीच्या मदतीनं गेल्यावर्षी जानेवारी फेब्रुवारीत देशभरातल्या 407 रेल्वेस्थानकांचं सर्वेक्षण केलं. यामध्ये रेल्वे स्थानकावरची दैनंदिन स्वच्छता, प्रसाधनगृहांची संख्या, प्रवाशांची सुरक्षा, विश्रामगृहांतल्या सुविधा यावर एक लाख 35 हजार प्रवाशांना प्रश्न विचारण्यात आले. त्यांची उत्तरं आणि स्वच्छतेच्या निकषांवर विजेत्यांची निवड करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 22, 2016, 8:55 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading