हिमायत बेगला फाशी ऐवजी जन्मठेप

हिमायत बेगला फाशी ऐवजी जन्मठेप

  • Share this:

German bakery

पुणे – 17 मार्च : पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी अतिरेकी हिमायत बेगला आज (गुरूवारी) फाशी ऐवजी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टाने हा निर्णय दिला आहे.

पुणे सेशन कोर्टाने इंडियन मुजाहिद्दीनच्या हिमायत बेगला 2013 मध्ये दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली आहे. फाशीच्या शिक्षेविरोधात त्याने मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. त्याच्या याचिकेवर मुंबई कोर्टाने आज हा निकाल दिला आहे.

13 फेब्रुवारी 2010च्या संध्याकाळी सातच्या सुमाराला पुण्यातल्या जर्मन बेकरीमध्ये स्फोट झाला. पुण्यावर झालेला हा पहिला दहशतवादी हल्ला. यात 17 जणांचा मृत्यू झाला, तर तर 58 जण जखमी झाले. इंडियन मुजाहिद्दीन या संघटनेने पाकिस्तानातुन या स्फोटाचा कट रचला होता. स्फोटानंतर काही महिन्यांनी इंडियन मुजाहिद्दीनेचा संघटनेचा सदस्य हिमायत बेगला पुण्यात अटक करण्यात आली. याप्रकरणी अटक करण्यात आलेला हिमायत बेग हा एकमेव दहशतवादी होता

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 17, 2016 04:12 PM IST

ताज्या बातम्या