सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी अजित पवारांची आज चौकशी

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 14, 2016 11:45 AM IST

ajit pawar ncpeपुणे - 14 मार्च : पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक असलेले राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची आज सह निबंधक यांच्याकडून चौकशी होणार आहे. सहकार कायद्यानुसार बडतर्फ संचालकांना दहा वर्ष निवडणूक लढवता येणार नसल्याने अजित पवारांच संचालक पद धोक्यात येणार आहे.

यापूर्वी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालक पदावरून पवारांना बडतर्फ करण्यात आल होतं. याआधी विजयसिंह मोहिते आणि दिलीप सोपल यांची चौकशी झाली होती .या प्रकरणात सहकार कायदा पूर्वलक्षी प्रभावाने राबवण्याच्या निर्णयाविरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल कऱण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 14, 2016 11:45 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...