नागपूर मेट्रोसाठी 600 कोटी आणि पुण्यासाठी फक्त 10 कोटी, पुणेकर संतप्त

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 1, 2016 08:59 AM IST

pune metro 34पुणे - 01 मार्च : केंद्रीय अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी केंद्रीय अर्थ संकल्पात पुणे मेट्रोसाठी फक्त 10 कोटींची तरतूद केली आहे. तर नागपूर मेट्रोसाठी सहाशे कोटी रुपयाची तरतूद आहे. त्यामुळे पुण्यातील राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या पुण्याबद्दलच्या धोरणावर कडाडून टीका केली आहे.

पुणेकरांनी भाजपला एक खासदार आणि आठ आमदार निवडून दिल्यानंतरही भाजपच्या केंद्रीय अर्थ मंत्र्यांनी पुणेकराची अर्थ संकल्पात चेष्टा करून तोडाला पानं पुसली आहेत अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे यांनी केली आहे. तर मुख्यमंत्री आणि एक वजनदार केंद्रीय मंत्री नागपूरचा असल्याने नागपूरला केंद्रीय अर्थ संकल्पात झुकतं माप दिलं गेलं अशी टीका सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली आहेे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 1, 2016 08:59 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...