भाजपने देशभक्त आणि देशद्रोही सर्टिफिकेट वाटू नये -राज ठाकरे

भाजपने देशभक्त आणि देशद्रोही सर्टिफिकेट वाटू नये -राज ठाकरे

  • Share this:

पुणे - 27 फेब्रुवारी : देशाविरोधात घोषणा देणार्‍यांना तिथेच फोडून काढा, पण त्याच्यावरून राजकारण करू नका. काश्मीरमध्ये पीडीपीशी हातमिळवणी करायची आणि दुसरीकडे लोकांना देशद्रोही ठरवायचं हे राजकारण बंद करा. भाजपने देशभक्त आणि देशद्रोही सर्टिफिकेट वाटू नये असा सणसणीत टोला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला लगावला. तसंच राज्यात जे 53 टोलनाके बंद झाले, त्याचं श्रेय मनसेलाच दिलं पाहिजे. आमच्या आंदोलनामुळेच टोल बंद झाले असा दावाही राज ठाकरे यांनी केली. ते पुण्यात बोलत होते.raj_on_bjp_jnu3

मराठी भाषा दिनानिमित्त पुण्यात मटा मैफलीचं उद्घाटन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते झालं. यावेळी मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी राज ठाकरेंची प्रकट मुलाखत घेतली. पुस्तकं, चित्रपट, माहितीपट, लहानपण आणि बाळासाहेब, अशा अनेक गोष्टींवर राज यांनी दिलखुलासपणे गप्पा मारल्या.

'टोलबंद मनसेमुळेच'

मनसेनं जर टोल विषयी आंदोलन छेडलं नसतं तर इतर कोणत्याही पक्षाने त्यावर भाष्य केलं नसतं. मनसेनं टोल आंदोलन केलं, जे काही टोल फोडले त्यामुळेच आज टोल बंद झाले आहे. आणि याचं श्रेय हे मनसेलाच दिलं पाहिजे असा दावा राज ठाकरेंनी केला. तसंच ज्या ठिकाणी रोख टोल वसुली सुरू आहे ती बंद केली पाहिजे अशी मागणीही राज यांनी केली.

मग काश्मीरमध्ये पीडीपीशी हातमिळवणी कशाला?

राज यांनी जेएनयू मुद्यावरही परखड मत व्यक्त केलं. जो कुणी भारताच्या विरोधात घोषणा देत असेल तर त्याला तिथल्या तिथे फोडलं पाहिजे. पण त्याच्यावर राजकारण करत बसू नका. भाजपला त्यांची विद्यार्थी संघटना जेएनयूमध्ये घुसवायची असेल आणि यासाठी देशभक्तीचं राजकारण करायचं असेल तर हे खपवून घेतलं जाणार नाही. भारताविरोधात अशा घोषणा दिल्या असेल आणि याचा जर इतका तिटकारा असेल तर काश्मीरमध्ये पीडीपी सोबत युती करतांना विचार केला पाहिजे असा सणसणीत टोला भाजपला लगावला. याच पीडीपी पक्षाने काश्मीर विधानसभेत अफझल गुरूचा ठराव मांडला होता. आणि आता तिथे सत्तेसाठी हातमिळवणी केली जात आहे. त्यामुळे देशभक्त आणि देशद्रोही हे राजकारण भाजपने बंद करावं. देशभक्त आणि देशद्रोही  सर्टिफिकेट भाजपने वाटू नये असा टोलाही राज यांनी लगावला.

मुख्यमंत्र्यांची नक्कल

मुख्यमंत्री नेहमी पूर्णाक अशा आकडेवारीत स्पष्टीकरण देतात. आता तुम्ही राज्य चालवताय तुम्ही काही हेडमास्टर नाहीत असा टोला लगावत राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची नक्कल काढून दाखवली. हेडमास्टर होण्यापेक्षा शेतकर्‍यांच्या प्रश्न नीट सोडवा असा सल्लाही राज यांनी दिला.

'आशाताईंवर रागावणं शक्य नाही'

गुलाम अलींच्या मुद्द्यावरून आशाताईंवर राग होता का, असं राज यांना सुधीर गाडगीळ यांनी विचारलं. आशाताईंवर रागावणं शक्य नाही. थोडी मतभिन्नता होती, असं उत्तर राज यांनी दिलं. तसंच आमच्या कलावंतचा मान पाकने राखला पाहिजे. जर तिथे आमच्या कलाकाराचा मान राखला तर आम्हीही इथं मान राखू पण जर तसं होत नसेल तर विरोध होणारच असंही राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 27, 2016, 5:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading