'आधी संजय दत्तच्या रजेचा अहवाल जाहीर करा नंतर सुटका करा'

  • Share this:

sanjay-dutt-61पुणे - 24 फेब्रुवारी : अभिनेता संजय दत्तची येरवडा कारागृहातून सुटका होण्या आधीच संजय दत्तला विरोध होऊ लागला आहे. कारागृहातून संजय दत्तची सुटका रद्द करण्यात यावी अशी मागणी भीम छावा संघटना आणि पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब हंगारगे यांनी केली आहे.

संजय दत्तने शिक्षेच्या काळात वारंवार घेतलेल्या पॅरोल आणि फ़र्लो रजेच्या परवानगीची चौकशी करण्यात येईल असं आश्वासन तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी दिलं होतं. मात्र, तो अहवाल प्रसिद्ध करण्यापूर्वीच संजय दत्तची सुटका करण्यात येत आहे. असं बाळासाहेब हंगारगे याचं म्हणणं आहे. उद्या संजय दत्तची सुटका होत असताना त्याचा आणि राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी येरवडा कारागृहाबाहेर काळे झेंडे दाखवून आंदोलन करण्यात येईल असं बाळासाहेब हंगारगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. संजय दत्तचा पॅरोल आणि फ़र्लो रजेची चौकशी अहवाल उघड करा त्यानंतर संजय दत्तची सुटका करा अशी मागणी भीम छावा संघटना आणि बाळासाहेब हंगारगे यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 24, 2016 08:38 PM IST

ताज्या बातम्या