दाभोलकर हत्येप्रकरणी 2 संशयितांची पॉलिग्राफिक टेस्टची सीबीआयची मागणी

दाभोलकर हत्येप्रकरणी 2 संशयितांची पॉलिग्राफिक टेस्टची सीबीआयची मागणी

  • Share this:

narendra dabholkarपुणे - 12 फेब्रुवारी : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास आणखी पुढे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सनातनचे साधक हेमंत शिंदे आणि निलेश शिंदे यांची पॉलिग्राफिक टेस्ट करण्यासाठी सीबीआयनं शिवाजीनगर कोर्टात अर्ज दाखल केलाय. या टेस्टसाठी आरोपींची संमती आवश्यक असते, तीही मिळालेली आली आहे.

सीबीआय ने हीच नाव बंद लिफाफ्यात उच्च न्यायालयात सादर केली होती या दोघाही साधकांचे मोबाईलचे टॉवर लोकेशन आणि त्यांनी दिलेली माहिती याबाबात बरीच तफावत आढळली आहे.

त्यामुळे पॉलिग्राफिक टेस्टचा अर्ज करण्यात आला आहे.यापूर्वी सनातन संस्थेनं मुंबईत पत्रकार परिषद घेऊन हे दोघेही निर्दोष असल्याचा दावा केला होता.

मात्र, ते सनातन प्रभात या पेपरचं वितरण करत असताना त्यांचे मोबाईल लोकेशन हे दाभोलकारांची हत्या झालेल्या ठिकाणांच्या आसपास असल्याच निदर्शनात आलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 12, 2016, 12:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading