S M L

राज्यघटना बदलली जाऊ शकते -मोहन भागवत

Sachin Salve | Updated On: Jan 28, 2016 04:42 PM IST

mohan bhagwatपुणे - 28 जानेवारी : संविधान बदलू शकत ते बदलता येऊ शकतं फक्त पद्धत संवैधानिक असायला हवी असं वादग्रस्त वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलंय. ते पुण्यात बोलत होते.

सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा राज्यघटनेत बदल करण्याचा विचार मांडला आहे. राज्यघटना बदलली जाऊ शकते, राज्यघटनेतच तशी तरतूद आहे असं भागवत यांनी म्हटलंय. पुण्यामध्ये एमआयटीच्या छात्र संसदेमध्ये बोलताना भागवत यांनी हा मुद्दा छेडलाय. राज्यघटना ही व्यवस्था आहे पण तो जगण्याचा आधार नाही, तर तो समाजाचा स्वभाव आहे असं मत भागवत यांनी व्यक्त केलंय. त्यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 28, 2016 02:47 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close