S M L

साहित्य संमेलनात तब्बल 4 कोटींची पुस्तक विक्री

Samruddha Bhambure | Updated On: Jan 18, 2016 08:53 PM IST

साहित्य संमेलनात तब्बल 4 कोटींची पुस्तक विक्री

NBT BOOK FAIR ME BOOK SATLL PER APNI PASAND KI BOOK KHARIDARI KERTE

पिंपरी - 18 जानेवारी : 89वा अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने यंदा मराठी पुस्ताकांची विक्रमी विक्री झाली आहे. यंदा साहित्य संमेलनात तब्बल चार कोटी रुपयांपेक्षाही जास्त पुस्तकांची विक्री झाली आहे.

साहित्य संमेलन म्हटलं की ग्रंथदालनंही आलीच. यावर्षी तब्बल 400 प्रकाशकांचे पुस्तकविक्री स्टॉल लावण्यात आले होते. पहिल्या दिवसापासून सुरू असलेल्या ग्रंथ प्रदर्शनाला यावेळी मोठ्यांबरोबर लहान साहित्याप्रेमींचा चांगला प्रतिसाद पहायला मिळाला. वाढ गर्दीचा त्रास होऊ नये म्हणून हे प्रदर्शन दोन भागांत विभागण्यात आलं होतं. पहिल्या दिवशी प्रदर्शनाला फारसा प्रतिसाद नव्हता, पण काल (रविवार) असल्यानं साहित्य रसिक - वाचकांसह हजारो नागरिकांची या स्टॉल्सवरती झुंबड पाहायला मिळाली.


Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 18, 2016 08:53 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close