S M L

पुण्यात चोरीच्या संशयावरुन पेटवलेल्या मुलाचा मृत्यू

Sachin Salve | Updated On: Jan 15, 2016 12:54 PM IST

Image img_188782_sasun_240x180.jpgपुणे -15 जानेवारी : बॅटरी चोरल्याच्या वादावरुन एका मुलाला पेटवण्यात आलं होतं. दोन दिवस त्याने दिलेली मृत्यूशी झुंज अपयशी ठरली असून सावन राठोड या तरुणाचा मृत्यू झाला आहे.

पुण्यातील कसबा पेठेत एका गाडीजवळ सावन राठोड खटपट करत असताना काही तरुणांनी त्याला पाहिलं. त्यांनी त्याच्यावर चोरीचा संशय घेतला आणि त्याला बेदम मारहाण केली.

एवढ्यावरच हे तरुण थांबले नाही त्यांनी पेट्रोल टाकून सावनला पेटवून दिले. यात तो 65 टक्के भाजला होता. त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दोन दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. पण दुदैर्वानं उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सावन हा मुळचा सोलापूरचा राहणारा आहे. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आलीये.


Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 15, 2016 12:54 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close