'त्या' मुलीला रोखणार्‍या पुणे एटीएस पथकाला इसिसकडून धमकी

'त्या' मुलीला रोखणार्‍या पुणे एटीएस पथकाला इसिसकडून धमकी

  • Share this:

isis_pune_ats 13 जानेवारी : पुणे एटीएसचे एसीपी भानूप्रताप बर्गे यांना सीरियातील दहशतवादी संघटनेच्या नावाने धमकी मिळाली. मुंबई पोलिसांना हा धमकीचा ई-मेल आलाय. त्यात पुणे एटीएस युनिट आणि भानुप्रताप बर्गे यांच्या कुटुंबीयांना उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. पोलिसांनी हा ईमेल नेमका कुठून आलाय. त्याचा तपास सुरू केला आहे.

भानू प्रताप बर्गे यांच्या टीमने मागील महिन्यात एका अल्पवयीन मुलीला इसिसमध्ये जाण्यापासून थांबवलं होतं. पुण्यातील एक 16 वर्षांची मुलगी इसिसच्या संपर्कात असल्याचं गुप्तचर यंत्रणेच्या तपासातून समोर आलं होतं. सोशल नेटवर्किंग साईटच्या माध्यमातून या मुलीशी संपर्क साधण्यात आला होता. एवढंच नाहीतर या मुलीला सुसाईड बॉम्बरही बनवण्याचा प्लॅन आखाण्यात आला होता. ही माहिती बर्गे यांच्या टीमला कळताच या मुलीला ताब्यात घेऊन तिचं मतपरिवर्तन केलं होतं. त्यानंतर या मुलीने इसिसचा मार्ग सोडला होता. तोच राग मनात धरुन बर्गेंना ही धमकी देण्यात आलीय का याचाही तपास केला जातोय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 13, 2016 11:30 AM IST

ताज्या बातम्या