'समृद्ध जीवन'च्या 45 कार्यालयांवर सीबीआयचे छापे, मोतेवारला पोलीस कोठडी

'समृद्ध जीवन'च्या 45 कार्यालयांवर सीबीआयचे छापे, मोतेवारला पोलीस कोठडी

  • Share this:

Motewar234

29 डिसेंबर : समृद्ध जीवन चिटफंड घोटाळ्या प्रकरणी अटकेत असलेला आरोपी महेश मोतेवार याच्या भोवतीचा फास आज (मंगळवारी) आणखी आवळला गेला.गुंतवणुकदारांना कोटय़वधींचा गंडा घातल्याप्रकरणी महेश मोतेवार यांच्या समृद्ध जीवनच्या एकुण 45 कार्यालयांवर आज सीबीआयने छापे टाकले. महाराष्ट्रासह ओडिशामध्ये छापे टाकण्यात आल्याची माहिती मिळाली.

'समृद्ध जीवन'च्या पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि सोलापूरमधील 58 कार्यालयांवर कारवाई करण्यात येणार असून, त्यापैकी 45 कार्यालयांवर आज छापे टाकण्यात आले आहे. सीबीआयचे अधिकारी कार्यालयांमध्ये विविध कागदपत्रांची छाननी करीत आहेत.

दरम्यान, फसवणुकीच्या एका गुन्ह्यात महेश मोतेवार याला काल (सोमवारी) उस्मानाबाद पोलिसांनी पुण्यातून अटक केली. त्याला आज (मंगळवारी) दुपारी उमरगा न्यायालयात हजर करण्यात आले होतं. न्यायालयाने मोतेवारला 31 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. न्या. एच. आर. पाटील यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यावर तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलिसांनी न्यायालयाकडे सात दिवसांची कोठडी मागितली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

 

First published: December 29, 2015, 9:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading