दिलीप वळसे पाटील यांना हृदयविकाराचा झटका

दिलीप वळसे पाटील यांना हृदयविकाराचा झटका

  • Share this:

dilipwalsepatil

13 डिसेंबर :  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार दिलीप वळसे पाटील यांना आज (रविवारी) सकाळी एका कार्यक्रमादरम्यान हृदयविकाराचा सौम्य झटका आला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त कात्रज दूध संघाच्यावतीने एक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमादरम्यान मंचावरच वळसे पाटील यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं. यानंतर तातडीने त्यांना भारती विद्यापीठ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी मंचावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. वळसे पाटील यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. 

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: December 13, 2015, 2:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading