उजनी धरणासाठीही पाणी सोडण्याचे आदेश

उजनी धरणासाठीही पाणी सोडण्याचे आदेश

  • Share this:

ujani dam sol29 ऑक्टोबर : मराठवाड्याप्रमाणेच उजनी धरणासाठी पाणी सोडण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे उजनीच्या पाण्याचा वादही पेटण्याची शक्यता आहे.

पुणे परिसरातल्या जिल्ह्यातल्या धरणाच्या क्षेत्रातल्या पाच धरणांतून पाणी सोडण्याचे हे आदेश आहेत. मुळशी, भामा आसखेड याबरोबरच पाच धरणांतून उजनी धरणात 291 दशलक्ष घनमीटर पाणी सोडा, असं या आदेशात म्हटलंय. मराठवाड्याला नाशिक आणि नगरमधून पाणी सोडण्याच्या निर्णयाला विरोध होतोय. त्यातच आता उजनी धरणाला पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आलेत. उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर भागातल्या दुष्काळी भागासाठी हे पाणी सोडण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: October 29, 2015, 8:20 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading