खालापूरजवळ क्वालिसला अपघात,7 ठार

खालापूरजवळ क्वालिसला अपघात,7 ठार

  • Share this:

pune_express_car aacident3421 सप्टेंबर :पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर खालापूर जवळील रसायनी गावाजवळ भरधाव वेगातील क्वालिस गाडीवरील वाहनचालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या भीषण अपघातात वाहनातील सातजण ठार झाले आहेत. तर, तिघे गंभीर जखमी आहेत. ही घटना आज दुपारी पावणेदोन वाजता घडली.

सर्व जखमींवर नवी मुंबईतल्या एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तिघांचीही प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. खालापूरजवळच्या रसायनी गावाजळ हा अपघात झाला.

भरधाव क्वालिसच्या ड्रायव्हरचं नियंत्रण सुटलं आणि या गाडीने डम्परवरला जोरदार धडक दिली. प्राथमिक माहितीनुसार, अपघातातील सर्व मृत हे सातारा जिल्ह्याच्या जावळी तालुक्यातील दोंडेवाडी गावचे रहिवासी आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 21, 2015 08:44 PM IST

ताज्या बातम्या