पुणे मेट्रोचे अडथळे दूर, लवकरच कामाचा श्रीगणेशा !

  • Share this:

pune metro 3409 सप्टेंबर : पुणे मेट्रो प्रकल्पातले अडथळे आता दूर झाले आहे. मेट्रो प्रकल्पाचं काम सुरू होणार आहे. दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन इथं झालेल्या केंद्रीय मंत्री, पुण्यातले लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकार्‍यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत मेट्रोच्या कामला हिरवा कंदील दाखवण्यात आला.

पुणे मेट्रो प्रकल्पाचा अहवाल दिल्ली मेट्रो प्राधिकरणानं तयार केला होता. या प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारनं 2013 मध्ये मंजुरी दिली होती. तर फेब्रुवारी 2014 मध्ये केंद्र सरकारनं प्रकल्पाला तत्वत: मंजुरी दिली होती. पुणे मेट्रोच्या कामाबाबत लोकप्रतिनिधींचं एकमत होत नव्हतं.

आज दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नगरविकास मंत्री व्यंकया नायडू, प्रकाश जावडेकर, पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, एमएसआरडीसी मंत्री एकनाथ शिंदे, दिलीप कांबळे यांच्या उपस्थिती बैठक पार पडली. या बैठकीत भुयारी मार्ग, उड्डाण मार्ग याबाबत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

पुणे मेट्रोच्या दोन्ही टप्प्याचे काम एकाचवेळी सुरू करण्यासोबतच आवश्यक तिथे उड्डाणमार्ग आणि भुयारी मार्गाचे काम सुरू करण्यात येणार आहे. लक्ष्मी रोड, कोथरूड, पुणे स्टेशन, बंडगार्डन हा मार्ग भुयारी असणार आहे. त्यामुळे 6 हजार कोटी रूपयांचा खर्च वाढणार आहे.

केंद्र सरकार 20 टक्के, महापालिका 10 टक्के तर राहिलेला निधी खर्च कर्ज काढून उभा केला जाणार आहे. पुण्याच्या लोहगाव विमानतळाचं विस्तारीकरण आणि पुणे रिंग रोडचं कामही लवकर सुरू करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First Published: Sep 9, 2015 08:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading