पुणे मेट्रो आणि विमानतळाचा प्रश्न महिन्याभरात मार्गी लावू -गडकरी

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Aug 22, 2015 05:52 PM IST

पुणे मेट्रो आणि विमानतळाचा प्रश्न महिन्याभरात मार्गी लावू -गडकरी

gadkari in pune_lokmatshow22 ऑगस्ट : पुणे मेट्रो आणि पुणे विमानतळाचा प्रश्न एका महिन्यात मार्गी लावू असं आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिलं. गडकरी यांनी आज राज्यातल्या अनेक मोठ्या प्रकल्पांच्या स्टेटसबद्दल माहिती दिली. पुण्यात लोकमत वृत्तपत्राच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

या कार्यक्रमात गडकरींनी शरद पवार यांच्या मदतीची आठवण करून दिली. पुणे नाशिक बायपास रस्त्याचं कामही लवकर सुरू होईल याच्यासाठीच्या भूसंपादनात शरद पवारांनी आपल्याला मदत केल्याची कबुली गडकरींनी दिली.

तसंच पुणे शहराच्या आजूबाजूला जवळपास 40 ते 50 हजार कोटींचे रस्ते बांधणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर पुण्यात सर्वच विद्वान असल्यानं अनेक सूचना येतात आणि त्या लक्षात घ्यावा लागतात, असा टोलाही गडकरींनी लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 22, 2015 05:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...