S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

बोपखेल दंगलीत जखमी झालेल्या पोलीस कर्मचार्‍याचा अखेर मृत्यू

Sachin Salve | Updated On: Aug 20, 2015 04:44 PM IST

बोपखेल दंगलीत जखमी झालेल्या पोलीस कर्मचार्‍याचा अखेर मृत्यू

20 ऑगस्ट : पिंपरी चिंचवडमधल्या बोपखेल दंगलीमध्ये जखमी झालेले पोलीस कर्मचारी रामचंद्र बांगर यांचा अखेर मृत्यू झालाय. गेल्या तीन महिन्यांपासून बांगर मृत्यूशी झुंज देत होते. अखेर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

गेल्या मे महिन्यात बोपखेल येथे लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या रस्त्यावरून वाद पेटला होता. न्यायालयाने निर्णय दिल्याचा दाखला देऊन रहदारीसाठी रस्ता बंद केल्याची नोटीस लष्करानं लावली होती. पूर्वसूचना न देता अचानक रस्ता बंद झाल्याने नागरिक आणि विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली. त्यामुळे पोलीस आणि स्थानिकमध्ये धुमश्चक्री उडाली होती. त्यावेळी तिथं तैनात असलेल्या पोलिसांनाच जमावानं मारहाण केली होती. त्यात बांगर गंभीर जखमी झाले होते. अखेर तीन महिन्यांची त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. आणि उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.


बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 20, 2015 04:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close