हाच का 'वंचित विकास'?, अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरण ठेवलं दडपून !

हाच का 'वंचित विकास'?, अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरण ठेवलं दडपून !

  • Share this:

pune_vanchit_sansta17 ऑगस्ट : पुण्यातल्या वंचित विकास संस्थेच्या निहार अनाथगृहात एका अल्पवयीन मुलीवर 2012 साली झालेला बलात्कार प्रकार संस्थेनं चक्क दडपून टाकला होता, असं आता समोर येतंय. 2012 साली इथल्या एका सुरक्षारक्षकानं संस्थेत राहणार्‍या एका मुलीवर बलात्कार केला होता.

निहार अनाथगृहात संस्था वेश्याव्यवसाय करणारर्‍या महिलांच्या मुलांसाठीची संस्था आहे. 2012 साली इथल्या सुरक्षारक्षकाने इथल्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. यातून गरोदर राहिलेल्या या मुलीला सांगली संस्थेत नेऊन तिची डिलिव्हरी करण्यात आली. आणि तिला झालेल मुलं परस्पर दत्तकही देण्यात आलं.

धक्कादायक बाब म्हणजे या मुलीला धमकावण्यात आलं. सुरक्षा रक्षकाचं नाव कुणाला सांगितलंस तर तुलाच जेल होईल, अशी धमकीही या मुलीला आणि तिच्या आजीला देण्यात आली.

या प्रकरणात पोलिसांनी आता संस्थाचालक महिलेसह तिघांना अटक केलीय. वंचित विकास ही वेश्याव्यवसाय करणार्‍या महिलांच्या मुलांसाठीची संस्था आहे. अटक करण्यात आलेल्या तिघांना 19 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावन्यात आलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: August 17, 2015, 6:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading